Subscribe:

Ads 468x60px

Featured Posts

  • "मी विदर्भातील शेतकरी बोलतो आहे"

    "मी विदर्भातील एक भारतीय शेतकरी ...जय जवान जय किसान मधला किसान ..माझे नाव घेउन लोकांनी या देशावर राज्य केले ... माझे फोटो काढून छायाचित्रकारान्नी पारितोषिके पटकवली ... माझ्यासाठी असलेल्या पैश्यावर सरकारी बाबुंचे बंगले झाले ... मला काही 'चेक' दिले गेले पण ते पण वटले नाही ......

  • असा महाराणा प्रताप ...

    १९ जानेवारी १५९७ रोजी महापराक्रमी असा महाराणा प्रताप यांचे राजधानी चावंड येथे मृत्यु. अकबराच्या काळात प्रत्येक हिन्दुच्या घोड्याच्या पाठीवर मुघलांच्या गुलामगिरिचे द्योतक म्हणुन तप्त लोहमुद्रा उठवली जात असे.बिन डागललेला घोड़ा आणि ताठ मानने वावरणारा हिन्दू फ़क्त राणा प्रतापच्याच राज्यात दिसत होता.सतत १४ वर्षे अकबराची सेना .....

  • ●๋•●๋• नविन वर्षाचा पहिला मानाचा मुजरा आपल्या राज्यांना ... ●๋•●๋•

    इतिहास नेहमीच रंगवून आणि मोठा करून सांगितला जातो असे म्हणता पण शिवरायांचे आत्ताचे किल्ले आणि गड पाहिले तर ते अंगावर अशी रोमहर्षता निर्माण करता आणि मनात एक प्रश्न चिन्ह निर्माण करता कि कसे काय हे असे जलदुर्ग आणि विशाल दुर्ग त्या समयी बांधले असतील ... काय तो काळ असेल जेव्हा असा थोर राजा आणि त्याचा प्रत्येक शब्द प्राण देऊन पेलणारे ते स्वराज्य सेवक घडले ....

26 January 2012

हा तोच झेंडा आहे

हा तोच झेंडा आहे जो प्राप्त करण्यासाठी हजारो लोकांनी आपले प्राण दिले .. अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले ..
आपले घर,संसार,आप्तस्वकीय सर्वांना डावलुन फक्त हा देश घडवण्यासाठी आणि हां तिरंगा अस्तित्वात आणण्यासाठी जीवन प्रवास रचला ...
आपले सैन्य आणि सुरक्षा दल आपले प्राण ह्या मातीसाठी देऊन आणि ह्या हरित भूमीला देश भक्तीचा लाल असा रक्त रंग देऊन ह्या तिरंग्याचा मान राखता ...

जन-गण-मन

आज आपल्या राष्ट्रगीतास १०० वर्षे पूर्ण झाले
सम्पूर्ण जन-गण-मन आपले राष्ट्रगीत

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे

24 January 2012

●๋•●๋• बूट फेक काव्य ●๋•●๋•

●๋•●๋• बूट फेक काव्य ●๋•●๋•

साहेब माफ़ करा मी बूट फेकून मारला
तुम्ही देश लुटता त्याचा तो राग धरला
तुम्ही तर प्रामणिक, आपले काम करता
दिवस रात्र एक करून, आपले बैंक खाते भरता
तुमचे ध्येय एकच आणि दिशा पण निश्चित
मते देता तुम्हा भरभरून सर्व अक्षिशित
माझी मती गेली जे मी भ्रष्ट झालो
दिड दमडीच्या नेत्यावर 'वूडलैंड' चा बूट फेकून आलो ...

23 January 2012

नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस
जन्म :- २३ जानेवारी १८९७, कटक
अदृष्य :- १८ ऑगस्ट १९४५, फोर्मोसा

२३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे सुभाषचंद्र बोस या महान क्रांतोसूर्याचा उदय झाला. जानकीनाथ व प्रभादेवी यांचे सुभाषचंद्र हे दैदिप्यमान अपत्य. लहानपणापासूनच प्रगल्भ असलेले सुभाषबाबू उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे आय. सी. एस. ची परीक्षा उच्चश्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना नोकरी मिळाली. पण त्या नोकरीमुळे त्यांना अस्वस्थता भासू लागली. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. स्वातंत्र्याची तळमळ त्यांना लागलेली, त्यांनी गांधींची भेट घेतली. परंतू त्यांच्या धोरणामूळे सुभाषबाबूंचे समाधान झाले नाही. मग ते देशबंधु चित्तरंजन दास यांचे शिष्य झाले.